अतिवृष्टीचा एसटीच्या गणपती वाहतुकीला फटका

मुंबई : गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. त्यानुसार मुंबई , ठाणे व पालघर या तीन विभागातून २३ बसेस आज सोडण्यात येणार होत्या. परंतु मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठिक,ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत.

मुंबई : गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी एसटीने जय्यत तयारी केली होती. त्यानुसार मुंबई , ठाणे व पालघर या तीन विभागातून २३  बसेस आज सोडण्यात येणार होत्या. परंतु मुंबईसह कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे  ठिक,ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत.त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे या बसेसना प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही मुंबई विभागातून दोन ठाणे विभागातून दोन अशा चार बसेस आज मार्गस्थ करण्याचे नियोजन होते .तथापि, मुंबई-गोवा महामार्गावर लोणेरे -माणगाव आदी ठिकाणी पाणी आल्याने सदरची वाहतूक आजच्यासाठी बंद करण्यात आले आहे.उद्या पावसाचा अंदाज घेऊन पुढची वाहतूक करण्यात येणार आहे. तत्पूर्वी काल रात्रीपासून व्यक्तिगत आगाऊ आरक्षणाला सुरूवात झाली आहे. गट आरक्षणासाठी (ग्रुप बुकिंग) संबंधित प्रतिनिधींनी जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.