आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

महाडमधील सिस्केप संस्था, प्रशांत साळुंके रेस्क्यू टीम, महाड उत्पादक संघटना, महाड एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरकी ट्रस्ट, आवाज ग्रुप महाड तसेच एनडीआरएफ पथक आदींचे प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री ना. आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

 महाड : २४ ऑगस्ट रोजी महाड  (Mahad) शहरातील तारीक गार्डनही पाच मजली इमारत कोसळून (Building Collapsed)  झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या (NDRF TEAM)  पथकासह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी धाव घेतली व आपत्ती व्यवस्थापन कार्यात शासनाला मोलाचे सहकार्य केले या विविध स्वयंसेवी संस्था व व्यक्तींचा सत्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगडच्या पालकमंत्री नामदार आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी महाडमधील सिस्केप संस्था, प्रशांत साळुंके रेस्क्यू टीम, महाड उत्पादक संघटना, महाड एमआयडीसी अग्निशमन दल आणि अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरकी ट्रस्ट, आवाज ग्रुप महाड तसेच एनडीआरएफ पथक आदींचे प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री ना. आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . महाड येथे २४ ऑगस्ट २०२० रोजी तारीक गार्डन पाच मजली इमारत कोसळली होती या इमारतीत दीडशे ते दोनशे रहिवाशी राहत होते.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकुन पडले होते या प्रसंगी हाती घेण्यात आलेल्या शोध व बचाव कार्यामध्ये महाड मधील अनेक संस्था व व्यक्तींनी भाग घेत ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. या वेळी सत्कार समारंभ संपन्न होत असताना माननिय जिल्हा अधिकारी निधी चौधरी यांनी शासकीय यंत्रणेच्या वतीने सर्वांचे कौतुक केले. अशा घटना घडल्यानंतर आता याचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्व नियोजन व्यवस्थेसाठी आणि सर्व संस्थांच्या मागणीवरून महाड येथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची तयारी म्हणून एनडीआरएफची एक कायम स्वरुपी यंत्रणा महाडमध्ये उभी करण्याचे आश्वासन पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिले.