लोकहो निघाला का कोकणात गणपतीला? जरा थांबा आधी हे नियम वाचा नाहीतर अर्ध्या रस्त्यात रिव्हर्स गेअर टाकावा लागेल

शासनाच्या नव्या नियमांनुसार आता तुम्हाला गावी जाण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह (RTPCR टेस्ट) असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला कोकणात प्रवेश मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चारमानी नाराज झाले आहेत.

    गणपतीसाठी अनेक चाकरमानी कोकणच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्याने आता सरकारने गणपतीसाठी नवी नियमावली लागू केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला गावी जाण्यासाठी या नियमांचं पालन करुनच पुढचा प्रवास करावा लागणार आहे.

    शासनाच्या नव्या नियमांनुसार आता तुम्हाला गावी जाण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह (RTPCR टेस्ट) असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला कोकणात प्रवेश मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक चारमानी नाराज झाले आहेत.

    गणपतीसाठी दरवर्षी अनेक लोक कोकणात जातात. यावर्षी देखील कोकणात जाण्यासाठी तब्बल १७०० एसटी गाड्यांचे आरक्षण सुद्धा करण्यात आलं आहे.

    १७०० हून अधिक गाड्यांचा आरक्षण आत्तापर्यंत झालं आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी तिकीट बुकिंग केलं आहे त्यांच्याकडे करोना चाचणी अहवाल असणं महत्वाचं आहे. या नियमांमुळे कुठेतरी चाकरमाण्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. पण करोनाचा धोका टाळण्यासाठी हे नियम बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे.