maharashtra corona cases

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २६ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २१८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

२१८ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी २६ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २१८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून २५४ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या २१८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २६,६२३ झाली आहे. यामध्ये ३१८४ रुग्ण उपचार घेत असून २२,८८३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या २१८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ४०, कल्याण प.- ६२, डोंबिवली पूर्व ६४, डोंबिवली प- ४०, मांडा टिटवाळा ८, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.