खडवली बेहेरे ग्रामपंचायतीमध्ये गंदगी मुक्त भारत अभियानास सुरुवात

ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ कल्याण तालुक्यातील खडवली बेहेरे ग्रामपंचायत येथून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्याहस्ते ठाणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिसोदिया, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या उपस्थितीत पार पाडला.

कल्याण : ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ कल्याण तालुक्यातील खडवली बेहेरे ग्रामपंचायत येथून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्याहस्ते ठाणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिसोदिया, गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या उपस्थितीत पार पाडला.

हे अभियान खेडोपाड्यांत वाड्या वस्त्यांत व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचायला हवे, या अभियानाचा शुभारंभ माझा झेडपी गटातून होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. राजकीय पटलावरील कल्याण तालुक्यातील इतिहासात पहिल्यांदाच मला ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. असे असताना तालुक्यातील रखडलेली प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून ५०लाख़ांची कामे प्रस्तावित केली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या संक्रमण काळात अंगणवाडी सेविका आशा वर्कर आरोग्य अधिकारी व कर्मचारी सफाई कामगार यांनी यांनी केलेल्या कामाचे कौतुक देखील त्यांनी केले.

       यासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिसोदिया यांनी देखील गंदगी मुक्त भारत अभियान हे देश राज्य जिल्हा तालुका व गाव पातळीवर राबवणार असल्याचे सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या “भारतीयांची प्रतिकार शक्ती ही चांगली आहे. आरोग्य व स्वच्छता यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक व्यक्तीने नागरिकांनी स्वतःहून आपल्यात अंगीकृत केले पाहिजे”. तसेच अभियानांतर्गत वृक्षारोपण, कार्यालयीन स्वच्छता, परिसर स्वच्छता प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना  दिल्या. गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी देखील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

       यावेळी विस्तार अधिकारी विशाखा परटोले, माजी सभापती दर्शना जाधव, सरपंच रोहिणी जाधव, वैभव दलाल, योगेश मोकाशी, समीर ठाणेकर, निखिल कशिवले (अध्यक्ष निसर्ग संवर्धन समिती), गिरीश भोईर अन्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तुषार पाटील, एसडीएमचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नागरिक, सफाई कामगार उपस्थित होते.