मुंबईमध्ये एक लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता मुंबईतील तब्बल एक लाख ७० हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत कोरोनाचे ११३२ नवे रुग्ण; ५० कोरोनाबाधितांचा मृत्यू

 मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता मुंबईतील तब्बल एक लाख ७० हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये ११३२ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २६ हजार ३७१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६९४० वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये ११३२ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ५० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३० पुरुष तर २० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३० जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. 

मुंबईत कोरोनाच्या ९२३ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल एक लाख ७० जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे. तर शहरात १९ हजार ६४ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.