जी उत्तर मध्ये केवळ ८६० ऍक्टिव्ह रुग्ण

धारावीत बुधवारी दिवसभरात ९रुग्ण सापडले असून दादर मध्ये ३७ रुग्ण तर माहीम मध्ये २५ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ७१ रुग्णांची भर पडली आहे.

मुंबई: धारावीत बुधवारी दिवसभरात ९रुग्ण सापडले असून दादर मध्ये ३७ रुग्ण तर माहीम मध्ये २५ नवे रुग्ण सापडल्याने जी उत्तर मध्ये ७१ रुग्णांची भर पडली आहे. धारावीत बुधवारी ९ नवीन रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या २६४३ वर पोहोचली आहे. तर केवळ ८७ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर २२९८ कोरोनामुक्त झाले. दादर मध्ये आज ३७ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही  २११३इतकी झाली आहे.तर ४७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये आज २५ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १९३३ इतकी झाली. तर २९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.जी उत्तर मध्ये एकूण ८६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत ७१ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही ६६८९ वर पोहोचली आहे.तर धारावी मध्ये २२९८,दादरमध्ये १५५२ तर माहीम मध्ये १५६१ असे एकूण ५४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.