ऑनलाईन माध्यमातून पर्यावरण पुरक आंतरशालेय इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन

पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण मधील कल्याण पूर्वेकडील आर्य गुरुकुल शाळेतर्फे दरवर्षी इको फ्रेडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा कोरोना संकटामुळे ही कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली.

आर्य गुरुकुल शाळेचा पुढाकार; इकोफ्रेंडली बाप्पाचे आज विसर्जन
कल्याण :  पर्यावरण संवर्धनासाठी कल्याण मधील कल्याण पूर्वेकडील आर्य गुरुकुल शाळेतर्फे दरवर्षी इको फ्रेडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा कोरोना संकटामुळे ही कार्यशाळा ऑनलाईन घेण्यात आली . या ऑनलाईन शिबिरात तब्बल १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेने यंदा विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणरायाची शाळेत स्थापणा केली होती आज पाचव्या दिवशी या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले .
एज्युकेशन टुडे फाउंडेशनच्या वतीने आर्यगुरुकुल शाळेने १६ ऑगस्ट रोजी पर्यावरण पूरक गणपती बनविणे या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कल्याण परिसरातील ३ शाळांनी सहभाग घेतला . १०५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने १०५ गणपतीच्या मूर्त्या बनवण्यात आल्या .गणपतीच्या विसर्जनाने निर्माण होणारे प्रदूषण व समस्या या गोष्टींचा विचार करूनच आर्य गुरुकुल शाळेत ‘एज्युकेशन टुडे फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विदययाने भरत मलीक सर यांच्या पमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला . यात यांनी गणपती विसर्जनाने होणारे प्रदूषण व समस्येची चर्चा केली व त्यातून हे प्रदूपण टाळण्यांचे उपाय सुचवले व त्यावर त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचा व आरास करण्याची शपथ घेतली . विद्यार्थ्यांनी बनविलेली एक सुंदर गणेश मुर्तिची शाळेत गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना करून मनोभावे पूजा अर्चा करून पाचव्या दिवशी टाळ मृदंगाच्या गजरात पूर्णपणे सोशल डिस्टन्मिग व तोंडावर मास्क घालून विसर्जन करण्यात आले . आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विसर्जन सोहळयात ऑनलाईन पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले. विसर्जनाकरिता शाळेतच एक छोटे तळे निर्माण करून सोशल डिस्टनसिंग आर्य गुरूकुल शाळेत अतिशय उत्साहात हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.