कल्याणमध्ये पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही : आमदार नरेंद्र पवार

कल्याण : अयोद्धेत होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपला आनंद व्यक्त करण्याकरिता आपल्या घरा समोर भगवा झेंडा, भगवी पताका, प्रभू रामचंद्रांचा फोटो लावण्याची परवानगी कल्याणातील श्रीराम भक्तांनी बाजारपेठ पोलिसांकडे परवानगी मागितली होती.

कल्याण : अयोद्धेत होणाऱ्या श्री राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपला आनंद व्यक्त करण्याकरिता आपल्या घरा समोर भगवा झेंडा, भगवी पताका, प्रभू रामचंद्रांचा फोटो लावण्याची परवानगी कल्याणातील श्रीराम भक्तांनी बाजारपेठ पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र बाजारपेठ पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारत रामचंद्रांचा फोटो जप्त करून एक प्रकारे पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.

      आज संपूर्ण जगात आनंदाचा दिवस असतांना, इतक्या वर्षांनी एक महत्त्वाची घटना घडत आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः या मंदिराचा शिलान्यास करत असतांना महाराष्ट्र सरकार आणि ठाकरे सरकारचे प्रतिनिधी असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी पारनाका परिसरात प्रभू रामचंद्रांचा फोटो, पताका आणि झेंडा लावण्यास विरोध केला. हि बाब निंदनीय असून आपण या पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.