Mumbai, Palghar Navi Mumbai will get light rain showers with cloudy weather for next 24 hours.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. सध्या थंडी पडत असल्याने आंबा आणि काजू झाडांना चांगला मोहोर आला आहे; मात्र अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात (Raigad District) ढगाळ वातावरण दिसत आहे. या ढगाळ वातावरणामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने (Rain) हजेरी लावली आहेत. अलिबाग , महाड , म्हसळा , पेण , खोपोली , माणगाव , रोहा , मुरुड या भागात पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. तर काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला आहे.

सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच हातचे आंबा पिक जाण्याची भीती आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. सध्या थंडी पडत असल्याने आंबा आणि काजू झाडांना चांगला मोहोर आला आहे; मात्र अचानक पडलेल्या पावसाने आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने बर्‍याच ठिकाणी धुळीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र अचानक आलेल्या पावसाने आता मार्गावर चिखल झाला आहे. तसेच वेंगुर्ले, बांदा, सावंतवाडी आणि कणकवली या शहरांसह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा आला आहे.