अवाजवी वीज बिला विरोधात राष्ट्र कल्याण पार्टी आक्रमक

लॉक डाऊनमध्ये नागरीकांचे काम धंदे बंद असताना वीज कंपनी कडुन वीज ग्राहकांना अव्वाच्यासवा वीज बिल पाठवुन ग्राहकांची लुट सुरु आहे. त्यामुळे नागरीकांच्या समोरील अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

कल्याण : लॉक डाऊनमध्ये नागरीकांचे काम धंदे बंद असताना वीज कंपनी कडुन वीज ग्राहकांना अव्वाच्यासवा वीज बिल पाठवुन ग्राहकांची लुट सुरु आहे. त्यामुळे नागरीकांच्या समोरील अडचणीत अधिक वाढ झाली आहे. याबाबत  राष्ट्र कल्याण पार्टी आक्रमक झाली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत. तर मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री यांना पत्र पाठवून वीज बिल कमी करण्याची मागणी केली आहे.  

महावितरणने लॉक डाऊनमध्ये अंदाजे बिल न देता वास्तविक वापर केल्यानुसार वितरित करुन ग्राहकांना वीज बिल देण्यात यावे. तसेच जे खराब मिटर आहेत ते मिटर २४ तासात बदली करावेत. आणि १ एप्रिल रोजी विद्युत नियामक आयोगाने वीज आकर मध्ये केलेली वाढ ही ग्राहकांसाठी अन्यायकारक असुन ही वाढ त्वरित मागे घ्यावी, या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची त्वरित दखल घेतली नाही तर महावितरण विरोधात राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी शासन, प्रशासन व महावितरणची असेल असा इशारा  राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी दिला आहे.

 सदर निवेदन कल्याण परिमंडळचे वरिष्ठ व्यवस्थापक (वि व ले) कट्टा विश्वनाथ राजलिंग यांना देण्यात आले. त्यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, कल्याण जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी, किरण शेळके, गौरव रेड्डिज, चंदन सिंह, संजय यादव, दिनेश राय उपस्थित होते.