भाजपात राहूनच आरक्षण मिळेल, नारायण राणेंचा शहाजोग सल्ला

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा देऊ नये, योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असंही नारायण राणे म्हणालेत. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याच्या चर्चेवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी संभाजी राजेंना सबुरीचा सल्ला दिलाय.

    सिंधुदुर्ग: मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती(Sambhaji Raje Chhatrapati) आक्रमक झाले असून, त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. तर दुसरीकडे त्यांनी मराठा आरक्षणासाठी भाजपनं दिलेली खासदारकी सोडण्यास तयार असल्याचं बोलून दाखवलंय. त्यावरूनच आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) संभाजीराजे छत्रपती यांना सबुरीचा सल्ला दिलाय.

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनामा देऊ नये, योग्य व्यक्तींना भेटल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असंही नारायण राणे म्हणालेत. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याच्या चर्चेवर भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी संभाजी राजेंना सबुरीचा सल्ला दिलाय.

    तुम्ही राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही जी मोहीम हातात घेतलीय, ती भाजपात राहूनचं केल्यास लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात, ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे, तर प्रश्न सुटू शकतो. मात्र तुम्ही राजीनामा देऊ नये, अशी विनंती असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय.