मिनी लॉकडाऊनमुळे सलून दुकाने बंद; आता दाढी कटिंग करावी लागणार घरातच…

    अलिबाग : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत आणि विंकेंड लाकडाऊनचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्बंधामध्ये सलून दुकानांचाही समावेश आहे. राज्यातील सलून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता दाढी आणि कठीण घरीचं करावी लागणार आहे. टाळेबंदीमुळे अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात न्हावी समाजातील सलून व्यावसायिक आणि कारागिरांना दुकाने बंद असल्याने कामच उरले नाही. त्यामुळे आठ हजारांवर सलून दुकानदार व कारागिरांसमोर रोजच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

    दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातून मोठ्या प्रमाणात होतो. त्यात सलूनच्या माध्यमातून याचा संसर्ग अधिक होण्याच्या संशयही आहे. टाळेबंदीत सलून बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात छोटी-मोठी आठ हजार दुकाने असून, त्यात १५ हजारांवर कारागीर कार्यरत आहेत. यात काही मोठी दुकानेही व्यावसायिकांची असली तरी त्यात काम करणाऱ्या कारागिरांची संख्या ही जास्त आहे.

    अनेक सलून दुकाने ही भाड्याच्या जागेत

    ज्यांचे पोट हे रोजच्या मिळकतीवर असते. मात्र, आता कामच उरले नसल्याने त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे.अनेक सलून दुकाने ही भाड्याच्या जागेत आहेत. अनेकांचे ठेलेही भाड्याच्या जागेवर आहेत. यात ठेल्याचे भाडे ३ हजार ते मोठ्या दुकानांचे भाडे १० हजारांवर आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने भाडे थकले आहे. सलून कामगारांसाठी सरकारने घर भाड्यात सूट द्यावी, वसुलीची सक्ती करून नये, असे आवाहन केले आहे. मात्र घरमालक पैशासाठी विचारणा करीत असल्याने कामच नसल्याने भाडे द्यायचे कसे, अशा पेचात छोटे दुकानदार सापडले आहेत. अशी मागणी सलून दुकानदारांकडून होतं आहे.तसेचं अनेक दुकानांमध्ये असलेले कारागीर हे बाहेर राज्यातील किंवा विदर्भाच्या विविध जिल्ह्यतून आलेले आहेत. यातील अनेकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना स्वस्त धान्याचा लाभही मिळत नाही. त्यामुळे अशा कारागिरांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

    दरम्यांन सलून दुकानदार नितीश म्हात्रे म्हणाले की, एक तर मागील वर्षभर आमची दुकाने कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे बंद होती. तशीच यावर्षी सुद्धा दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता संसार चालवायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. आता तरी या लाॅकडाऊनमध्ये आमची दुकाने सुरू ठेवण्यास सूट मिळावी. अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

    सावेळी अलिबाग येथील नाभिक संघटनेचे उपाध्यक्ष राजू राधव यांची प्रतिक्रीया जाणून घेतली. ते म्हणाले की, अनेक न्हावी हे मिळेल त्या रिकाम्या जागेवर कच्चे दुकान, ठेला उभारून काम करतात. काही तर फुटपाथवर एक छोटी खुर्ची टाकून रोजच्या मिळकतीतून परिवाराचा गाडा चालवतात. मात्र, टाळेबंदीने कुणालाच काम नसल्याने विस्कटलेली परिस्थिती कशी सावरायची, असा प्रश्न पडला आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.