भाजपा मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी शक्तीवान भोईर यांची  वर्णी

भाजपाचे मांडा टिटवाळा येथील सक्रीय आणि तळा– गाळात उतरून सर्वसामन्यांसाठी कार्य करणारे युवा कार्यकर्ते अशी ओळख असलेले शक्तीवान भोईर यांची मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

कल्याण : भाजपाचे मांडा टिटवाळा येथील सक्रीय आणि तळा– गाळात उतरून सर्वसामन्यांसाठी कार्य करणारे युवा कार्यकर्ते अशी ओळख असलेले  शक्तीवान भोईर यांची  मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शक्तीवान भोईर यांना  शालेय जीवनापासून समाजकार्याची आवड असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सक्रिय राजकारणात त्यांनी सहभागी घेतला. आजवर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक समाजिक कार्य त्यांनी केली आहेत . पक्षाने जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजकार्याच्या माध्यमातून अनेक माणसे जोडून पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी संघटना वाढीसाठी त्यांनी अथक  प्रयत्न केले.  याचीच दाखल घेऊन पक्षाने सन २००५ साली वार्ड अध्यक्ष, सन २०१० साली मोहना टिटवाळा मंडळ सरचिटणीस व सन २०२० साली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली. 

        दहा प्रभागाची अध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात पडल्याने आनंदाच्या क्षणाहून माझ्यासाठी आता जबाबदारी वाढली आहे याची जाणीव मला आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या क. डो. म. पा निवडणुका लक्षात घेता जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून विकासाच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा विस्तार करून भक्कम पायाभरणी कशी करता येईल यासाठी सर्वात जास्त मी प्रयत्नशील असणार आहे. त्यातच भारतीय जनता पक्षासारख्या सुसंस्कृत व प्रखर देशाभिमानी पक्षाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो. अश्या भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या 

        त्यांची पत्नी उपेक्षा भोईर दोन वेळा नगरसेविका त्यानंतर उपमहापौर पदी विराजमान झाल्या आहेत. ग्राउंड लेव्हलला सामान्य कार्यकर्ता म्हणून कोणत्याही पदांना न भुलून प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही आमच्यातील सामान्य कार्यकर्ता अजन्म जागृत ठेवू असे देखील ते म्हणाले. 

       प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटिल, खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून जनसेवा करून पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तसेच या अगोदर अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पाटील यांचे आभार मानून त्यांच्या अनुभवातून वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.