राज्यभरात आतापर्यंत ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण झाले बरे

राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईन -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,४९२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)* : मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५), सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४, इतर राज्य १५.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.