लवकर देवालय सुरु करा अन्यथा घंटानाद आंदोलन करू : आमदार चव्हाण

गणपती बाप्पा आले, गौरी पूजनही झाले आता पुरे झाले. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. राज्य सरकारने आता देवालये बंद करणे बास करावे. यापुढे देवालये बंद ठेवण्यात आली तर देवदर्शनासाठी संघर्ष करून घंटानाद आंदोलन करू असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

डोंबिवली : गणपती बाप्पा आले, गौरी पूजनही झाले आता पुरे झाले. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. राज्य सरकारने आता देवालये बंद करणे बास करावे. यापुढे देवालये बंद ठेवण्यात आली तर देवदर्शनासाठी संघर्ष करून घंटानाद आंदोलन करू असा इशारा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.

याबाबत भाजप आमदार चव्हाण म्हणतात गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही.आम्ही निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच.रामनवमीला श्रीरामाचे मुखदर्शन नाही. हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणस्पर्शाला पारखे झालो, अंतर राखलं. माता भगिनींनी वट पौर्णिमेचा व्रत घरातूनच जपलं. चातुर्मास सुरु झाला. आषाढी एकादशीला आम्ही विठोबाच्या दर्शनाला आतुर झालो. माऊलीला मनातूनच दंडवत घातला. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार राहूनच गेला.

पवित्र श्रावण महिना आला आणि गेला, श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही. दहीहंडीच्या उत्साहाला मुरड घातली. गणपती बाप्पा आले गौरी पूजनही संपन्न झाले, पण आता पुरे राज्य सरकारने आता बास करावे.भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. लवकरात लवकर देवालय सुरु करा.

जर राज्य सरकारने देवालये सुरू केली नाहीत तर भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करेल. येत्या शनिवार २९ ऑगस्ट २०२० रोजी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करून देवालये उघडण्यासाठी संघर्ष करेल.