विद्युत मंडळाच्या विविध समस्यांबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन

पेण शहरातील विद्युत मंडळाचे लक्ष वेधून घेऊन शहरातील विद्युत मंडळाच्या अनेक समस्या संतोष गवस (जिल्हाध्यक्ष रायगड), सचिन नाकते( उप जिल्हाध्यक्ष), काशिनाथ ठाकूर (जिल्हा सरचिटणीस रायगड), सुलतान साटी विधान सभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

सर्व्हे करून समस्यांचे निराकरण करणार – उमाकांत सकपाळे

पेण: पेण शहरातील विद्युत मंडळाचे लक्ष वेधून घेऊन शहरातील विद्युत मंडळाच्या अनेक समस्या संतोष गवस (जिल्हाध्यक्ष रायगड), सचिन नाकते( उप जिल्हाध्यक्ष), काशिनाथ ठाकूर (जिल्हा सरचिटणीस रायगड), सुलतान साटी विधान सभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंडरग्राऊंड डीपीचे बॉक्स तसेच उघडे असणारे फेस बॉक्स या दोन धोकादायक गोष्टी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

 

त्याचप्रमाणे चक्रीवादळाच्या काळात उन्मळून पडलेले पोल अर्धवट कटिंग करण्यात आल्याने त्यामुळे देखील अपघात होण्याची शक्यता असल्याने हे पोल पूर्णपणे कट करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पेण विद्युत मंडळाचे अधिकारी उमाकांत सकपाळे यांनी या समस्यांचा पूर्णपणे सर्व्हे करून डीपीचे बॉक्स बसविण्यात येतील आणि पोल देखील पूर्णपणे कट करण्यात येतील असे सांगितले.यावेळी रोहित शिंदे, प्रहार जनशक्ती पक्ष, पेण शहर अध्यक्ष, हर्षल प्रकाश मोकाशी, पेण शहर उपाध्यक्ष उपस्थित होते.