तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नसल्याने  तहसीलदारांना निवेदन

शासनाने ग्रामस्थ , शेतकरी यांच्या महसुली कामकाजासाठी प्रत्येक गावात तलाठ्याची नेमणूक केलेली आहे सदर तलाठ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी दिलेल्या वारी व वेळेत हजर राहून ग्रामस्थांची कामे करणे आवश्यक असताना तलाठी सजा जोहे हे त्यांची नियुक्ती झाल्यापासून अत्यंत कमी दिवस जोहे तलाठी कार्यालयात उपस्थित राहिलेले आहेत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.

तलाठी दिलेल्या वेळेत हजर न राहिल्यास मनसे आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार

पेण : शासनाने ग्रामस्थ , शेतकरी यांच्या महसुली कामकाजासाठी प्रत्येक गावात तलाठ्याची नेमणूक केलेली आहे. सदर तलाठ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी दिलेल्या वारी व वेळेत हजर राहून ग्रामस्थांची कामे करणे आवश्यक असताना तलाठी सजा जोहे हे त्यांची नियुक्ती झाल्यापासून अत्यंत कमी दिवस जोहे तलाठी कार्यालयात उपस्थित राहिलेले आहेत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केलेली आहे.

आपल्या देशात कोरोना व्हायरस मार्च २०२० पासून झाला परंतु त्या पूर्वीपासून हे तलाठी कार्यालयात उपस्थितीतच राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची तलाठी कार्यालयाशी संबंधित अनेक कामे पडून राहिलेली आहेत.
ग्रामस्थांनी सदर तलाठ्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उद्धट व उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. तरी संबंधित तलाठी यांना जोहे कार्यालयात दिलेल्या वारी व वेळेवर उपस्थित राहण्याची सक्त ताकीद देण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांच्या न्यायहक्कासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रा. जि. सचिव रुपेश पाटील यांनी सांगितले.