नीट,जेईईच्या विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवासाला परवानगी देण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन

मुंबई उपनगरातील जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना (JEE and NEET student)उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी (permission for railway travelling)द्या अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई : मुंबई उपनगरातील जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना (JEE and NEET student)उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी (permission for railway travelling)द्या अशी मागणी करीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांनी जर राज्य शासनाने प्रस्ताव दिल्यास परवानगी देण्याबाबत सहमती दर्शवली आहे, अशी माहिती आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

उद्यापासून सुरू होणाऱ्या नीट, जेईई परीक्षेसाठी महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून त्यांच्या परिक्षा प्रवेश पत्रावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे लेखी व दूरध्वनीवरुन केली.दूरध्वनीवरुन त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार त्यांनी तत्वतः परवानगी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

मात्र तसा प्रस्ताव राज्य. शासनाने रेल्वेला सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधीत मंत्री, अधिकारी यांना याबाबत प्रस्ताव तातडीने रेल्वे मंत्रालयाला सादर करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ही पत्राव्दारे केली.ही परवानगी मिळाल्यास मुंबई उपनगरातील सुमारे ५०, हजार विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांना सुरक्षित व वेळेत परिक्षेला पोहचता येईल, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.