पोलादपूर  येथे  नदीच्या पात्रात अडकलेल्या तीन व्यक्तींना वाचविण्यात यश

पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील लेप्रेसि हॉस्पिटलसमोरून वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रामध्ये १ इसम अडकल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेले २ तरुण असे ३ जण अडकले होते व त्यांना वाचविण्यात यश आले असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

 रेस्क्यू साहित्य काळाची गरज

पोलादपूर  :पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील लेप्रेसि हॉस्पिटलसमोरून वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रामध्ये १ इसम अडकल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेले २ तरुण असे ३ जण अडकले होते व त्यांना वाचविण्यात यश आले असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

       याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर येथे सावित्री नदीच्या संगमापलीकडे भंगार गोळा करण्यासाठी गेलेला तरुण काल दुपारनंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिथेच अडकला. तानाजी किसन जाधव असे या युवकाचे नाव आहे. त्याला वाचविण्यास गेलेले दिलीप जाधव आणि असिफ मुजावर हे सुद्धा अडकले होते.याबाबत सायंकाळी माहिती मिळताच त्यांना वाचविण्यासाठी प्रशासन देखील हजर होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून अथक प्रयत्नानंतर रात्री १० नंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले  यावेळी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीम,स्थानिक संस्था,प्रशासन व स्थानिक तरुणांच्या मदतीने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.यावेळी पोलादपूर सपोनि प्रशांत जाधव,हवालदार दीपक जाधव, तहसीलदार दीप्ती देसाई, नायभ तहसीलदार समीर देसाई,महाड रेस्क्यूचे प्रशांत साळुंखे, विकी साळुंखे, मनोज रेशीम ,विशाल रेशीम, बंटी जाधव ,शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे व पोलादपूरचे तरुण नासिर धामणकर,सचिन दुदुस्कर, प्रवीण पांडे,सुयोग सागवेकर, अनुराग मोरे, कयूम निगुडकर,छोटू दीक्षित,असिफ चाफेकर,वैभव सुकाळे, बाबी जगताप,राहुल वरोसे या सर्वांनी मेहनत घेतली.मात्र पावसाळ्यातील आंबेनली घाट ,सावित्री दुर्घटना सारख्या मोठ्या दुर्घटना लक्षत घेता प्रशासनाने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ना आपत्ती निवारण चे शिबीर द्वारे प्रक्षिशन दिल्यास व साधने उपलब्ध करून दिल्यास तातडीने कार्यवाही करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे रेस्क्यू साहित्य उपलब्ध व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.