भिवंडीत पावसाच्या पाण्याने रस्त्याना नदीचे स्वरूप 

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने (rain) सर्वांनाच झोडपून काढले. भिवंडी शहरात ही मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असलेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत

भिवंडी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने (rain) सर्वांनाच झोडपून काढले. भिवंडी शहरात ही मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असलेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. असे असतानाच खोका कंपाऊंड कणेरी या भागात मार्च महिन्यात केलेली रस्ता दुरुस्ती सततच्या पावसात वाहून गेली असतानाच रस्त्या लगतच्या गटारी ही साफ न झाल्याने या भागातील सर्व पाणी रस्त्यावरून सतत वाहत आहे .त्यामुळे हा रस्ता रस्ता न भासता  नदीच्या पाण्याचा वाहता पाट असल्याचाच जणू भास होत आहे .त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावर वाहत्या पाण्यातूनच नागरीकांना आपल्या वाहनांसोबत मार्गक्रमण करावा लागत आहे .