चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली मोटार, दाम्पत्याला मोटारीबाहेर काढण्यासाठी पोलिसांची घटनास्थळी धाव

कोल्हापूर मंगळवारपेठ येथील प्रदीप करढोणे (६२), पत्नी स्वाती (५५) यांच्या समवेत फोंडाघाट ते कोल्हापूर, असा मोटारीने (एमएच-09- एफएस-0560) प्रवास करत होते. फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलपुढे सुमारे दीड किलोमीटरवरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटार दरीत कोसळली. ती दहा फूट खोलीवरील झाडात अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून बचावली. मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याने आत दाम्पत्य अडकून पडले होते.

    कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात काल शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार दरीत कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाहीये. दाम्पत्याला मोटारीबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    कोल्हापूर मंगळवारपेठ येथील प्रदीप करढोणे (६२), पत्नी स्वाती (५५) यांच्या समवेत फोंडाघाट ते कोल्हापूर, असा मोटारीने (एमएच-09- एफएस-0560) प्रवास करत होते. फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलपुढे सुमारे दीड किलोमीटरवरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटार दरीत कोसळली. ती दहा फूट खोलीवरील झाडात अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून बचावली. मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याने आत दाम्पत्य अडकून पडले होते.

    घाटमार्गातून जाणाऱ्या वाहन चालकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर घाटमार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दाम्पत्याला बाहेर आणले. अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्या गेल्याने दाम्पत्याला फारशा दुखापती झाली नाहीत. पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे आणि इतर सहाय्यक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.