सुतारवाडीत सुरू आहे विजेचा लपंडाव

परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी गणपतीची स्थापना होण्यापूर्वी शनिवार (दिनांक २२ ऑगस्ट) रोजी सकाळी नऊ वाजता या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

सुतारवाडी :  परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी गणपतीची स्थापना होण्यापूर्वी शनिवार (दिनांक २२ ऑगस्ट) रोजी सकाळी नऊ वाजता या परिसरात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे गणपती सणासाठी ठिक-ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आहे त्यावर परिणाम होत आहे. अचानकपणे वीजपुरवठा खंडित होत असतो त्यामुळे बल्ब, पंखे, फ्रीज आदींवर परिणाम होत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी तर एक फेज जाणे, वारंवार वीजप्रवाह कमी झाल्याने लाइट डीम होणे असे प्रकार घडत आहेत. ऐन सणाच्या दिवसात विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.