मुंबई – गोवा महामार्गावर अनोखे आंदोलन

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांची चाळण निर्माण झालेली असल्याने यावर्षी देखील मुंबई - ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आपला प्रवास खड्ड्यातून करावा लागत आहे.

पेण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यांची चाळण निर्माण झालेली असल्याने यावर्षी देखील मुंबई – ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आपला प्रवास खड्ड्यातून करावा लागत आहे. त्यामुळे या महामार्गाचे ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि राज्य सरकार यांचा निषेध व्यक्त करून या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज आरपीआय आणि दिपक  निकाळजे सामाजिक विकास संघटना आणि  येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र मिळून आंदोलन केले. ते नागोठणे या २५ किलोमीटर अंतरावर महामार्गावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी रायगड उपजिल्हा अध्यक्ष परवेज वाघेला, आरपीआय पेण विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत पाटील, पेण तालुका अध्यक्ष प्रतिक मढवी, विभाग प्रमुख मोहन नागावकर,कार्याध्यक्ष विनोद जोशी, खजिनदार गणेश राऊत,प्रवीण म्हात्रे,सुर्या भोईर, सुधाकर पाटील,करण वाघेला, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.