…आणि ९५ वर्षाच्या बेगमबी मुजावर यांनी कोरोनाला हरवलं; दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी नतमस्तक होऊन घेतले आशीर्वाद

तर या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील सुद्धा ९५ वर्षाच्या बेगमबी मुजावर यांची ही सकारात्मकता पाहून चक्क त्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी या आजींचे आशीर्वाद घेतले. आमदार ऋतुराज पाटील यांनी अतिशय नम्रपणे केलेली ही कृती पाहून जणू नातवाला समोर पाहिल्यासारखे बेगमबी यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले.

    कोल्हापूर : व्हाईट आर्मी आणि जैन बोर्डिंगच्या वतीने कोल्हापूरच्या चिमाजी चौकात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या कोविड सेंटरमध्ये सोमवार पेठेत राहणाऱ्या तब्बल ९५ वर्षाच्या बेगमबी गुलाब मुजावर यांनी १५ दिवसात जीवघेण्या कोरोनाला हरवून ही लढाई एखाद्या मातब्बरा प्रमाणे जिंकून जगण्याच्या सकारात्मक वृत्ती पुढे अशा आजाराला न घाबरता हरवता येते हेच दाखवून दिले.

    तर या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील सुद्धा ९५ वर्षाच्या बेगमबी मुजावर यांची ही सकारात्मकता पाहून चक्क त्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी या आजींचे आशीर्वाद घेतले. आमदार ऋतुराज पाटील यांनी अतिशय नम्रपणे केलेली ही कृती पाहून जणू नातवाला समोर पाहिल्यासारखे बेगमबी यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले.

    कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्या बेगमबी गुलाब मुजावर यांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते डिस्चार्ज कार्ड देण्यात आले.यावेळी या कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या अन्य रुग्णांना उद्देशून आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोनाला घाबरू नका,वेळेत उपचार घ्या म्हणजे तुम्ही निश्चितपणे कोरोनावर मात करू शकाल.

    व्हाईट आर्मी कोविड सेंटरचे प्रमुख अशोक रोकडे यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना कोविड सेंटर मधील उपचार पध्दतीबद्दल माहिती दिली. यावेळी रुग्णांचे नातेवाईक आणि व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक सुद्धा उपस्थित होते.

    95 year old Begumbi Mujawar defeated Corona South MLA Rituraj Patil bowed down and took blessings