राजू शेट्टींची परिक्रमा : कार्यकर्त्यांने घेतली पुलावरून उडी

    जयसिंगपूर : पुरग्रस्तांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींनी प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी परिक्रमा सुरू आहे. आज या पदयात्रेचे कुरुंदवाड हुन नृसिंहवाडीकडे मार्गक्रमण सुरू आहे. ही यात्रा आता दरम्यानपंचगंगा नदी पात्रात दिनकरराव यादव पुलावरून एका कार्यकर्त्याने उडी मारली आहे. रेस्कू फोर्सच्या पथकाने यांत्रिक बोटीच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले.

    जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे पुलावर बंदोबस्त पाहणी साठी आले होते. त्यांच्या समोरच उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. दिनकर राव यादव पुलावर मोठा पोलीस बंदोबस्त असून रेस्क्यू फोर्स ने ही मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठे नियोजन करण्यात आले आहे.

    राजू शेट्टींना जलसमाधी घेण्यापासून आधीच अटकाव करण्यासाठी पोलिसांनी नृसिंहवाडीत येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तर दिनकरराव यादव पुलाजवळ रेस्क्यू फोर्सची 5 पथके, दहा यांत्रिक बोटीसह मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात केले आहेत.