ज्येष्ठ शेतकरी,कामगार नेते डॉ.एन.डी.पाटील यांच्या बाबतीत चुकीची माहिती पसरविणाऱ्या अज्ञाताविरूध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते माजी आमदार एन. डी.पाटील यांची शरीरयष्टी उत्तम आहे.त्यामुळे या वयातही प्रकृती अगदी ठणठणीत आहे.वयाच्या ९२ व्या वर्षात कोरोनावर मात केली आहे. मात्र काही अविचारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचे निधन झाले आहे, अशा आशयाचे खोटे संदेश पसरविले आहेत. कष्टकऱ्यांच्या सोबत अविरत काम करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत अशी बातमी किंवा मॅसेज पसरवणे उचित नाही.

    कोल्हापूर : ज्येष्ठ शेतकरी,कामगार नेते डॉ.एन.डी.पाटील यांच्या निधनाबाबतीत चुकीची माहिती पसरविणाऱ्या अज्ञाताविरूध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गुन्हा इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दाखल केला आहे.

    कोल्हापूरचे ज्येष्ठ नेते माजी आमदार एन. डी.पाटील यांची शरीरयष्टी उत्तम आहे.त्यामुळे या वयातही प्रकृती अगदी ठणठणीत आहे.वयाच्या ९२ व्या वर्षात कोरोनावर मात केली आहे. मात्र काही अविचारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांचे निधन झाले आहे, अशा आशयाचे खोटे संदेश पसरविले आहेत. कष्टकऱ्यांच्या सोबत अविरत काम करणार्‍या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत अशी बातमी किंवा मॅसेज पसरवणे उचित नाही, असे खोडसाळपणाचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍या अज्ञाताविरूध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    खोटी बातमी,संदेश व्हायरल करणार्‍या अविचारी प्रवृत्तीचा तात्काळ शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सक्त सुचना दिल्या असून शाहुपूरी पोलीस पुढिल तपास करत आहेत.यापुढे, ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्याबाबत कोणी चुकीची बातमी पसरवली तर त्यांच्यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला .