अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी हेरवाडच्या एकावर गुन्हा

    शिरोळ : अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्न केल्या प्रकरणी हेरवाड येथील एका विरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी या घटनेची फिर्याद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे. रोहन सुभाष सोलापुरे (रा. हेरवाड ता. शिरोळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

    शनिवार (दि. 21) रोजी ही घटना घडली. पोलिसांनी संशयित आरोपी सोलापूरे याला ताब्यात घेतले असून बाललैंगिक अपराध संरक्षण अधिनियम (फोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील करीत आहेत.