प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    हातकणंगले : हातकणंगले शहरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या विजय रामचंद्र मोंगले (रा. धनगर गल्ली, हातकणंगले) याला अटक करून त्याच्याकडील सुमारे २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील सांगली, कोल्हापूर रोडवरील हॉटेल यशसमोर असलेल्या अर्जुन पान शॉपमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू व गुटखा यांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून सदर कारवाई केली. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत

    जुगार अड्ड्यावर छापा

    हातकणंगले पोलिस ठाणे हद्दीतील रुई गावात जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने जुगार अड्डयावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ९ आरोपींसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार अडड्यातील आरोपी याकूब सूधाकर साठे, तानाजी धुळाप्पा वडर, तौफिक हुसेन शिरोळे, राहुल दगडू साठे, इरफान ताज्जुदीन मुल्ला, जयपाल तुकाराम शिंगे, उत्तम धुळाप्पा वडर, (सर्व रा. रूई) व दादासो वराळे (माणकापुर), गुरूदेव पांडूरंग सकट (रा. कबणूर) यांच्या सह रोख रक्कम १५  हजार ४५० रुपये व इतर जुगाराचे साहित्य ८३ हजार व मोटारसायकली असे साहित्य जप्त केले असून, अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल लाड करत आहेत.