A box containing the body of a young man found in the creek; Murder of a young man in an immoral relationship

अपत्य प्राप्तीसाठी विकृत मित्रानेच आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या आठ वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार कागल येथे घडला.

    कोल्हापूर : अपत्य प्राप्तीसाठी विकृत मित्रानेच आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या आठ वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार कागल येथे घडला. वरद रवींद्र पाटील (वय ८, रा. सोनाळी, ता. कागल) असे या मुलाचे नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

    वरदच्या वडिलांच्या मित्राने अपत्यप्राप्तीसाठी बळी दिल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर सोनाळीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आजोबा दत्तात्रेय शंकर महातूगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावर्डे बुद्रुक येथील गाव तलावात मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.

    याची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. आजोबा दत्तात्रेय मातूगडे यांनी सावर्डे बुद्रुक येथे नवीन घर बांधले आहे. घराच्या वास्तुशांतीसाठी डॉक्टर रवींद्र पाटील त्यांच्या पत्नी व मुलगा वरद सावर्डे बुद्रुक येथे गेले होते. दिवसभर घरातील सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर वरद रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे गायब झाला.वडील आणि नातेवाईकांनी मुलाचा शोध घेतला. पण वरद सापडला नाही.

    मुरगूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. मुरगूड कागल पोलिसांनी शहरासह जिल्ह्यात व कर्नाटकातही मुलाचा शोध घेतला. पण त्याचा शोध लागला नव्हता. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलाचा मृतदेह गाव तलावात आढळून आला. त्याच्या अंगावर अमानुष मारहाण केल्याचे जखमांचे व्रण आहेत .