धक्कादायक ! किरकोळ कारणातून तरुणाचा भोसकून खून

मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून (Murder in Kolhapur) केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे येथे शनिवारी मध्यरात्री घडली.

    कोल्हापूर : मंडपात लायटिंग लावण्याच्या कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून (Murder in Kolhapur) केल्याची घटना करवीर तालुक्यात खेबवडे येथे शनिवारी मध्यरात्री घडली. वैभव साताप्पा भोपळे (वय २५, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    हल्लेखोर सुरज सातापा पाटील (वय २५ रा. खेबवडे) हा शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. नवरात्र काळात ही घटना घडल्याने खेबवडे परिसरात तणावाची वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रमोद जाधव, जिल्हा विशेष पथकाचे तानाजी सावंत, इस्फूरलीचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मध्यरात्रीच खेबवडे येथे दाखल झाला आहे.

    या प्रकरणी पोलिस सूत्रांनी सांगितले की, खेबवडे येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवशंभु तरुण मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मध्यवर्ती चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी चौका लगत असलेल्या मंगल कार्यालयात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री देवीची आरती झाल्यानंतर मंडळाचे सर्व कार्यकर्ते चौकात थांबले होते. यावेळी दोघांच्यात वाद होऊन ही घटना घडली.