Bribe

सहा हजाराची लाच घेताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यांना रंगेहात अटक झाली आहे. विशेष म्हणजे एसीबीने कार्यालयातच सापळा रचला होता.

कोल्हापूर :  सहा हजाराची लाच घेताना उत्तर विभाग महावितरणचा (MSEB) अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यांना रंगेहात अटक झाली आहे. विशेष म्हणजे एसीबीने (ACB) कार्यालयातच सापळा रचला होता.

तक्रारदाराच्या वडीलांचे सौर यंत्रणा विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. तक्रारदाराच्या ग्राहकाच्या घरी 10 किलोवॅटची सौर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी ग्राहकाच्या नावने रितसर अर्ज उत्तर उपविभाग, नागाळा पार्क येथील महावितरणच्या कार्यालयात दिला. संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंता  मांडके यांची भेट घेवून सौर यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या 10 किलोवॅट वीजेबाबत तक्रारदाराने चर्चा केली. त्यावेळी मांडके यांनी तक्रारदाराला प्रकरण मंजूर करून देण्यासाठी प्रत्येक 1 किलोवॅट करिता 600 रूपये याप्रमाणे 10 किलोवॅटचे 6 हजार रूपये द्यावे लागतील तरच मी तुमचे काम मंजूर करून देईन, नाहीतर देणार नाही, असे सांगितले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदारांच्या समक्ष पडताळणी केली असता पडताळणीमध्ये 6 हजार रूपये लाच मांडके यांनी मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम लागलीच घेवून येण्यास सांगितले.  त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 हजार रूपये लाच स्वीकारतना त्‌यास रंगेहाथ अटक केली. आबासाहेब परशराम मांडके,  याच्याविरूध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.