प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन(Sugarcane production in maharashtra) झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत सुरू राहिला. पुणे व सोलापूर या विभागांत ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे.

    कोल्हापूर: राज्यातील ७३ साखर कारखान्यांकडे १२७७ कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. त्यापैकी २९ कारखान्यांकडे तब्बल ९१३ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकून पडले आहेत. या कारखान्यांविरोधात साखर आयुक्तांनी साखर जप्तीची कारवाई केली आहे. शंभर टक्के एफआरपी देणारे ११७ कारखाने असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

    राज्यात यंदा उसाचे मोठे उत्पादन झाल्याने हंगाम एप्रिलपर्यंत सुरू राहिला. पुणे व सोलापूर या विभागांत ऊस मोठ्या प्रमाणात पिकल्याने साखरेचे उत्पादनही वाढले आहे.राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या उसाची २३ हजार ३२० कोटी ५७ लाख रुपये देय एफआरपी आहे. या एफआरपीपैकी २२ हजार ४३ कोटी १३ लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.तसेच १२७७ कोटी ४४ लाख रुपये एफआरपी शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

    फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

    View Results

    Loading ... Loading ...

    एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत. राज्यातील एकूण ११७ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिलेली असून, त्यातील २० कारखाने हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्या शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे न दिलेल्या एकूण २९ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे.

    एकूण एफआरपी देयचे प्रमाण पाहिले तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी दिलेले ६८ कारखाने आहेत.

    सर्वांत कमी एफआरपी देणारे पाच कारखाने – पाणगेश्वर, लातूर -० टक्के, किसनवीर खंडाळा – ५ टक्के, तासगाव शुगर – २६ टक्के, किसनवीर, भुईंज – ३२ टक्के, भीमा टाकळी, सोलापूर – ४३ टक्के