६ ऑक्टोबरला मातोश्रीबाहेर आंदोलन तर १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक ; मराठा आंदोलकांचा इशारा

मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. ६ ऑक्टोबरला 'मातोश्री'बाहेर (Agitation outside Matoshri on 6th October) आंदोलन तर १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Band on 10th October) करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर: मराठा आरक्षणाला  (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने (SC) स्थगिती दिल्याने मराठा आरक्षण संघर्ष समितीने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. ६ ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर (Agitation outside Matoshri on 6th October) आंदोलन तर १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Band on 10th October) करण्याचा इशारा मराठा संघर्ष समितीने दिला आहे. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापुरात आज मराठा समाज समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन समितीचे आबा पाटील यांनी हा इशारा दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका बाहेर येत नसल्याने तरुणांमध्ये संभ्रमाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी. समाजाशी संवाद साधावा. मंगळवारपर्यंत निर्णय घ्या. त्यानंतर मात्र, ६ ऑक्टोबर रोजी आम्ही मातोश्रीसमोरच आंदोलन करू, असा इशारा आबा पाटील यांनी दिला.

सर्व सवलती देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये १० टक्के आरक्षण देण्यात येणार नाही, मात्र ईडब्ल्यूएसच्या सर्व सवलती देण्यात येतील, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीतही घेण्यात आला. आरक्षणाचा लाभ वगळून अन्य सवलती देण्यास आमचा विरोध नाही, असे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क/शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, सारथीसाठी १३० कोटींचा जादाचा निधी आदींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला

यावेळी आबा पाटील यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. विवेक रहाडे या विद्यार्थाची आत्महत्या हे त्याचे एकट्याचे बलिदान नाही. या बलिदानातून आता तरी सरकारने जागे व्हावे.