निवडणुका लढवण्याबाबतचे अंतिम अधिकार वरिष्ठ नेत्यांनाच – अजित पवारांनी नाना पटोले यांना फटकारले ;जीएसटीवरून चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

अजित पवारांनी(Ajit Pawar Statement) केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुका स्वबळावर लढवण्याचे विधान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या मताला महत्त्व नसल्याचे स्पष्ट होत आहे.

    कोल्हापूर: राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही,असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी कोल्हापूर(Kolhapur Press Conference) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

    अजित पवारांनी(Ajit Pawar Statement) केलेल्या वक्तव्यामुळे निवडणुका स्वबळावर लढवण्याचे विधान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांच्या मताला महत्त्व नसल्याचे स्पष्ट होत आहे.

    जीएसटी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर कोरोना वैद्यकीय साहित्यामध्ये सवलत मिळाली, असा उल्लेख करुन पवार म्हणाले केंद्र शासनाकडून जीएसटीचा परतावा राज्याला २३ हजार कोटी मिळणे बाकी आहे.त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळात असल्याने खरी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने जीएसटीची रक्कम दिली असताना राज्य शासनाने ओरड करू नये असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे हे अज्ञानातून आलेले आहे.त्यांना वास्तवातील आकडेवारी माहीत नसल्याने ते काहीही बोलतात. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी त्यांची अवस्था झाली आहेत,असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी यांच्याबाबतीत लगावला.