काेल्हापुरात ‘स्वाभिमानी’चा आक्रोश; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्राेश मोर्चा काढला.

  कोल्हापूर : महापूर येऊन एक महिना उलटून गेला, शासनाने शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाची दमडी दिलेली नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मोर्चा काढू नका, असा सल्ला देणारे शासन एक महिना झोपा काढत होते काय असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्राेश मोर्चा काढला.

  पंचनाम्यातच शासनाचे दप्तर अडकले

  मंत्री मंत्री जयंत पाटील यांनी पंचगंगेच्या पुराचे पाणी बोगद्याद्वारे दुष्काळी भागाला वळवणार, मात्र या योजनेचा खर्च किती आहे, याचा विचार केलेला नाही. यासाठी पैसा कुठून आणायचा, याबाबतचे धोरण नाही, अशा खरमरीत शब्दात शेट्टी यांनी पाटील यांचा आंदाेलकांनी समाचार घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र महापुराने हाहाकार उडाला होता. अनेकांची घरे पाण्यात बुडाली. शेतकऱ्यांच्या ऊस पिकाबराेबर खरीप हंगाम पूर्णता वाया गेला आहे. शासनाने पंचनामे करून तत्काळ मदत देणार असे जाहीर केले होते. परंतु अद्याप पंचनाम्यातच शासनाचे दप्तर अडकले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, असे शेट्टी म्हणाले.

  महिला शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग

  दसरा चौकातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा शहरातील विविध मार्गावरून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात शेतकरी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. विविध मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याच ठिकाणी या मोर्चाची सांगता करण्यात आली. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  शासनाने अमदतीचे धोरण ठरविलेले नाही, असे मंत्री ओरडून सांगत आहेत. परंतु राज्याचे मदत पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी २०१५ च्या निर्णयानुसार मदत मिळणार आहे. जास्तीत जास्त पाचशे कोटीपर्यंत लागतील, असे एक जबाबदार अधिकारी सांगत आहेत. परंतु मंत्री शुद्ध लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. महापुरावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. भांडवल योजना प्रत्यक्षात येणार नाही, तोपर्यंत यावर निश्चित उपाय निघणार नाही.

  – राजू शेट्टी, माजी खासदार