इन्कमटॅक्स विभागाचा अधिकारी प्रताप महादेव चव्हाण
इन्कमटॅक्स विभागाचा अधिकारी प्रताप महादेव चव्हाण

काही वर्षांपासून इन्कमटॅक्स न भरलेल्या शहरातील एका नामांकित डॉक्टरकडून त्याच्या निवासस्थानी छापा न टाकण्यासाठी तब्बल 20 लाखाची लाच मागणी करून तडजोडीअंती 14 लाखावर व्यवहार ठरवून त्यातील 10 लाखाचा हप्ता लाच म्हणून स्वीकारताना इन्कम टॅक्स विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. प्रताप महादेव चव्हाण (वय ३४) रा.राजारामपुरी कोल्हापूर असे या निरीक्षकाचे नाव आहे.आज दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन फुलावर अक्षरशः रस्त्यावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडण्यात आले.त्यामुळे हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

कोल्हापूर (Kolhapur).  काही वर्षांपासून इन्कमटॅक्स न भरलेल्या शहरातील एका नामांकित डॉक्टरकडून त्याच्या निवासस्थानी छापा न टाकण्यासाठी तब्बल 20 लाखाची लाच मागणी करून तडजोडीअंती 14 लाखावर व्यवहार ठरवून त्यातील 10 लाखाचा हप्ता लाच म्हणून स्वीकारताना इन्कम टॅक्स विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. प्रताप महादेव चव्हाण (वय ३४) रा.राजारामपुरी कोल्हापूर असे या निरीक्षकाचे नाव आहे.आज दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन फुलावर अक्षरशः रस्त्यावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडण्यात आले.त्यामुळे हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

शहरातील एका नामवंत डॉक्टरच्या विरोधात अज्ञात व्यक्तीने इन्कमटॅक्स विभागाकडे आयकर भरला नसल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता.या अर्जाच्या अनुषंगाने इन्कमटॅक्स विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती.या चौकशी दरम्यान निवासस्थानी छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता. हा छापा टाकू नये अशी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केली, त्यावेळी प्रताप चव्हाण याने 20 लाख रुपयाची लाच मागणी केली.शेवटी तडजोड करून हा व्यवहार 14 लाख रुपयांवर ठरला होता. गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रताप चव्हाण आणि डॉक्टरमध्ये ही तडजोड सुरू होती. दरम्यान संबंधित डॉक्टरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधून दिली.

ठरलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपये आज देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेताना चव्हाण याला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. आयकर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांच्या पोटात भीतीने पोटात गोळा आणणाऱ्या प्राप्तिकर विभागाच्याच अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.