Annual General Meeting of Gokul Dudh Sangh in Kolhapur

कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीच चर्चेचा विषय असते. गोकुळच्या सभेत नेहमीच धुमशान पहायला मिळते. या सेभेतील खुर्च्यांची फेकाफेकी रोखण्यासाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली आहे.

कोल्हापुर : कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीच चर्चेचा विषय असते. गोकुळच्या सभेत नेहमीच धुमशान पहायला मिळते. या सेभेतील खुर्च्यांची फेकाफेकी रोखण्यासाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली आहे.

बुधवारी दुपारी एक वाजता गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सभेत नेहमीच गदारोळ पहायला मिळतो. सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाने सभेसाठी ठेवलेल्या हजारो खुर्च्या एकमेकांना बांधून ठेवल्या आहेत. गोकुळची सर्वसाधारण सभा आणि वाद हे समीकरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत खुर्च्यांची फेकाफेक होऊ नये यासाठी या खुर्च्या बांधून ठेवल्या आहेत. तर, संपूर्ण सभामंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

एक वेळेस आमदारकी नको पण गोकुळ दूध संघाचे संचालक पद द्या, अशी म्हण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षे रूढ झालेली आहे. याला कारणही तसंच आहे. संपूर्ण राज्याला गाय आणि म्हैशीचं सकस दूध पुरविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बलाढय गोकुळ दूध संघ म्हणजे लक्ष्मी लाभ आणि राजकारणातील उत्कर्ष. विविध राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा यावर डोळा असतो.