kolhapur corrupt officer

जमिनीचे मूल्यांकन(land valuation) कमी करण्यासाठी ४५ लाखांची मागणी करून २० लाखांची लाच (corrupt officer arrested)स्वीकारताना कोल्हापूर येथील सहायक नगर रचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau)आज सापळा रचून रंगेहाथ पकडले.

    कोल्हापूर: जमिनीचे मूल्यांकन(land valuation) कमी करण्यासाठी ४५ लाखांची मागणी करून २० लाखांची लाच (corrupt officer arrested)स्वीकारताना कोल्हापूर येथील सहायक नगर रचना अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau)आज सापळा रचून रंगेहाथ पकडले.ही कारवाई कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आली.

    गणेश माने असे अटक करण्यात आलेल्या संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे.माने याने जमिनीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी ४५ लाखाची मागणी केली होती.त्यातील २० लाख रुपये लाच स्वीकारताना कार्यालयाच्या बाहेरच चहाच्या टपरीवर माने याला रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले.तक्रारदाराने २२ जानेवारीलाच याबाबत तक्रार दिली होती.खातरजमा करून पंचांच्या समक्ष ही कारवाई आज करण्यात आली.