राणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती : हसन मुश्रीफ यांचा कबूलीनामा

मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते.  ते म्हणाले की, भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करू नका, मराठा आरक्षण टिकले नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू, असे आवाहनही त्यांनी केले.

  कोल्हापूर : खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला सर्वपक्षीय अनेक खासदार, आमदार आणि मंत्री उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या वतीने भुमिका मांडताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, आम्ही जी चूक केली. तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिले, राणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती असे ते म्हणाले.

  कायदा नीट असता तर टिकला असता

  मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते.  ते म्हणाले की, भाजपला हात जोडून विनंती, राजकारण करू नका, मराठा आरक्षण टिकले नाही म्हणता, पण कायदा नीट केला असता तर टिकला असता, त्यामुळे आता एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू, असे आवाहनही त्यांनी केले.

  लोकसभेत आवाज उठवेन

  शिवसेना खासदार धैर्यशील माने यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले आहे. सर्व प्रतिनिधींना एकत्र केले आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाश आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकले आहे. ते नक्कीच यशस्वी होईल.

  आरक्षण कोणामुळे थांबलं?, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही? हा समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन.