उपमुख्यमंत्री अजित पवारानी कोल्हापुरात न्यू पॅलेस गाठल्याने संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज आणि मालोजीराजे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.  येत्या १६ तारखेला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देणा-या खासदार संभाजीराजे छत्रपती यानी भाजपवर नाराजी व्यक्त करत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्यामुळे खासदार संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात आणण्यासाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी कोल्हापुरातील न्यू पॅलेस गाठल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. ही भेट मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतली असली तरी त्यात संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा असल्याचे कळते.

  कोल्हापूर :  राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप असलेल्या कोल्हापूरात कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज आणि मालोजीराजे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.  येत्या १६ तारखेला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक देणा-या खासदार संभाजीराजे छत्रपती यानी भाजपवर नाराजी व्यक्त करत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वक्तव्य केले. त्यामुळे खासदार संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात आणण्यासाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी कोल्हापुरातील न्यू पॅलेस गाठल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. ही भेट मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतली असली तरी त्यात संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा असल्याचे कळते.

  संभाजीराजे आता भाजपवर नाराज

  खासदार संभाजीराजेंनी दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यामध्ये अपयश आल्यानंतर ते राजकारणापासून दूर होते. त्यानंतर भाजपने संभाजीराजेंना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार करत सन्मान केला. मात्र ते आता भाजपवर नाराज आहेत. पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच त्यांनी मला कोणी शिकवू नये असे म्हणत आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

  कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीची उमेदवारी

  माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने २०२४ चे संभाजीराजे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील या पक्षाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी स्वतंत्र लढल्यास प्रा. संजय मंडलिक हे शिवसेनेच्या वतीने मैदानात उतरतील. अशावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह संभाजीराजेंचा पर्याय पुढे येऊ शकेल. सर्वमान्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येण्यास फारशा अडचणी येतील असे वाटत नाही. शिवाय मालोजीराजेंनी शहरातून पुन्हा एकदा विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहेच. तोच धागा पकडून सध्या महाविकास आघाडीकडे या घराण्याची वाटचाल सुरू असल्याचे समजते.

  खासदारकीची मुदत पुढील वर्षी संपते

  या सर्व पार्श्वभूमीवर नाराज संभाजीराजेंना राष्ट्रवादी पक्षात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित होते. संभाजीराजे मात्र उपस्थित नव्हते. मुळात संभाजीराजेंनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारू नये असे शाहू महाराजांना वाटत होते. पण संभाजीराजेंनी राष्ट्रपती नियुक्त खासदार पद घेत आपली राजकीय वाटचाल सुरू केली. पण, त्यांनी भाजपचा शिक्का बसू नये याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या खासदार पदाची मुदत पुढील वर्षी संपत आहे. सध्या धनंजय महाडिक भाजपमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी लोकसभेसाठी उमेदवाराच्या शोधात आहे. अशावेळी संभाजी महाराज हे त्यांना समर्थ पर्याय असू शकतात. यासाठीच आत्तापासूनच पक्षाची व्यूहरचना सुरू असल्याचे समजते.