खडसेंना कोण कृषी मंत्री पद देणार आहे हे विरोधकांना विचारा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : एकनाथ खडसे यांना राजकीय जाण तर आहेच पण ते समजुतदारही आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. खडसे आमचे नेते आहेत ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांना जे कृषी मंत्रीपद देणार आहेत त्यांनाच विचारा नेमकं चाललंय काय? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केला.

कोल्हापूर : एकनाथ खडसे यांना राजकीय जाण तर आहेच पण ते समजुतदारही आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. खडसे आमचे नेते आहेत ते पक्ष सोडणार नाहीत. त्यांना जे कृषी मंत्रीपद देणार आहेत त्यांनाच विचारा नेमकं चाललंय काय? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केला.

माजी मंत्री एकनाथ खडसे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.गेल्या पाच वर्षांपासून खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीनाट्य सुरू आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली जाणार असून त्यानंतर त्यांना कृषी मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.याबाबत चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,”एकनाथ खडसे आमचे नेते आहेत. राजकारणात प्रत्येकाची काही ना काही अपेक्षा असते.आपल्याला सन्मान मिळावा अशीही अपेक्षा असू शकते. खडसे यांच्याशी गेल्या पाच वर्षांपासून माझी चर्चा सुरू आहे. काही वेळा आपल्याला जे अपेक्षित असते असे होतेच असे नाही. पण खडसे हे अतिशय समजुतदार राजकारणी आहेत. आमच्यासाठी ते नेते आहेत.पक्षाची हानी होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाहीत. प्रसारमाध्यमातूनच या चर्चा सुरू आहेत. पण खडसे पक्ष सोडणार नाहीत.त्यांची नाराजगी दूर होईल.एक – दोन आठवड्यात सर्व काही सुरळीत होईल. असा विश्‍वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

कांजूरमार्ग येथील मिठागरे आणि पानवनस्पतींचे काय?

मुंबईमधील मेट्रो कारशेड बद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले,”पर्यावरण संवर्धनाचे कारण देऊन आरे कारशेड कांजुरमार्ग येथे हलवण्यात आले. पण येथेही मिठागरे आहेत. तेथील पाणवनस्पती या कारशेडमुळे नष्ट होणार आहेत. त्याचे काय? मिठागरे भर टाकून मुजवून घेण्यासाठी मोठी रक्कम खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प ठप्प असल्याचे त्याची किंमत आणखी वाढली. २०२१ ला जे काम पूर्ण होणार होते. ते आणखी पुढे गेल्याने प्रकल्पाचा खर्च काही हजार कोटींनी वाढणार आहे. शिवाय कांजुरमार्ग येथील जागा न्यायालयीन वादात आहे ती ताब्यात मिळण्यासाठीही बराच काळ जाणार असल्याने आणखी तोटा वाढेल.’