Attempts to develop tourism of two men, 200 lost wells discovered by wandering

महाराष्ट्रात शिवकालीन आणि पांडवकाळापासून बारव जनतेची तहान भागवत होते. परंतु काळाच्या ओघात आता या बारव लुप्त होताना दिसत आहेत. या बारव पांडवकालीन, शिवकाली आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधल्या गेल्या आहेत.

कोल्हापूर : पांडवकालीन, शिवकालीन आणि पेशवाई काळात राज्यातील जनतेच्या आणि खेड्यापाड्यातील मावळ्यांच्या तहान भागवणाऱ्या बारव म्हणजेच नैसर्गिक जलस्त्रोत साठवण्यासाठी तयार केलेल्या इतिहासकालीन विहीरी आता लुप्त (lost wells) होत चालल्या आहेत. हे दुर्दैवी असल्यामुळे याच विहीरींच्या संवर्धनासाठी (Attempts to develop tourism) महाराष्ट्रातील दोन ध्येयवेडे झगडत आहेत. त्यांनी या बारव शोधण्यासाठी कित्येक ठिकाणे पालथी घातली आहेत.

दोन्ही तरुणांनी आता बारव संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. महाराष्ट्रातील रोहन अशोक काळे मुंबईचा रहिवासी आहे. तर त्याचा मित्र मनोज सिनकर हा लोणावळ्याचा रहिवासी असून दोघेही उच्चशिक्षित आहेत. राजस्थान आणि गुजरातमधील स्वच्छ, सुंदर बारव पाहिल्यानंतर रोहनने महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या बारव संवर्धनाचा ध्यास घेतला. रोहन चांगल्या नोकरीला होता परंतु त्याने ध्येयासाठी १ वर्ष नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. त्याने अनेक ठिकाणं बारव शोधण्यासाठी पिजून काढली. यामध्ये त्याचा मित्र मनोजनेही त्याला साथ दिली. राज्यातील अनेक गावांत भटकंती करत झाडा-झुडुपांत लुप्त होत चाललेल्या २०० बारव (200 lost wells discovered) शोधल्या. या बारवच्या संवर्धनासाठी दोघेही ग्रामस्थांना आवाहन करत आहेत.

महाराष्ट्रात शिवकालीन आणि पांडवकाळापासून बारव जनतेची तहान भागवत होते. परंतु काळाच्या ओघात आता या बारव लुप्त होताना दिसत आहेत. या बारव पांडवकालीन, शिवकाली आणि अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधल्या गेल्या आहेत. यामुळे प्रत्येक बारवचे बांधकाम हे वेगवेगळ्या शैलीत केले आहे. ज्या बारव सुस्थिती आहेत अशा ठिकाणी त्यांचे संवर्धन करुन पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येऊ शकतात.