अहो आश्चर्यम् !!   दोघा जुळ्या भावांना पडले दहावीच्या परीक्षेत सेम टू सेम गुण !!

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जवळपास सारीच मुलं उत्तीर्ण झाल्याने घराघरात आनंद द्विगुणित झाला. मात्र आम्ही आज दोन जुळ्या सेम टू सेम भावांची गुणगाथा तुम्हाला सांगतो आहोत,

प्रज्वल देसाई आणि प्रणित देसाई या दोघां जुळ्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या भावांना दहावीच्या परीक्षेत  गुणही सेम टू सेम मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कोल्हापूरच्या फुलेवाडीत राहणाऱ्या देसाई कुटुंबीयांची ही दोन जुळी मुलं,फुलेवाडीच्या श्री गुरुदेव विद्यानिकेतन मध्ये शिकत होती. दोघांनाही ५०० पैकी ४४५ गुण दहावीच्या परीक्षेत मिळाले. आणि त्यांची टक्केवारी सुद्धा सेम टू सेम म्हणजे एकूण ८९% आली.

त्यामुळे चेष्टेने नातेवाईकांनी अरे , तुमच्या दोघांचे परीक्षेतील नंबर मागेपुढे होते का ? असं विचारायला सुरुवात केली. मात्र प्रज्वल आणि प्रणित या दोघांनी आम्ही अभ्यास सुद्धा स्वतंत्र खोलीत करायचो आणि आमचे दोघांचे परीक्षेचे नंबर सुद्धा वेगवेगळ्या केंद्रावर आले होते ,असे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.पण या दोघांना सेम टू सेम गुण मिळाल्याने कोल्हापूर शहरात मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.