बिअरबार-हॉटेल्स सुरू; मग् मंदिर बंद का? भाजपचा सवाल, अंबाबाई मंदिरासमोर शंखनाद आंदोलन

राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपच्यावतीने मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात देखील भाजपच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर समोर घंटा आणि शंखनाद करण्यात आला.

    कोल्हापूर (Kolhapur) : राज्यातील सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे सुरू करावीत, या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपच्यावतीने मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन सुरू आहे. आज कोल्हापुरात देखील भाजपच्यावतीने करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर समोर घंटा आणि शंखनाद करण्यात आला.

    मंदिरावर आधारित अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत आहे. आज राज्यातील बियर बार हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत; मात्र या मंदिरांच्या जीवावर गरीब जनता उदरनिर्वाह करते. ही मंदिर अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे येत्या १० दिवसात राज्य सरकारने राज्यातील मंदिर सुरू करावीत; अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्यावतीने कोल्हापुरात देण्यात आला आहे.