कोरोनाच्या संकटात भाजपच्या वतीने राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य : देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारशी समन्वय ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास महाविकास आघाडी सरकारला आम्ही भाग पाडू अशी ग्वाही आज कोल्हापुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची वाढणारी आकडेवारी खूपच चिंताजनक आहे. कोरोनाच्या या भयंकर संकटात भाजपच्या वतीने राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करत आहोत. राज्य सरकारशी (State Government) समन्वय ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास महाविकास आघाडी सरकारला आम्ही भाग पाडू अशी ग्वाही आज कोल्हापुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आज ते कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम छत्रपती प्रमिलाराजे (CPR) जिल्हा सरकारी रुग्णालयास भेट देऊन कोविड रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कोरोना काळात राज्य सरकारला सहकार्य करण्याची आमची भावना आहे. मात्र राज्य सरकार आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारला वारंवार लक्ष करत असल्याचे सांगून केंद्र सरकारने सर्वात जास्त आर्थिक मदत महाराष्ट्राला केल्याचे फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारला माझं सांगणं आहे कि, ही लढाई मोदी सरकारशी नसून कोरोनाशी आहे. हे महाविकास आघाडीने लक्षात घ्यायला हवे. आज भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी धार्मिक स्थळे सुरु करण्यासाठी आंदोलन केले,

देशात सर्व ठिकाणी धार्मिक स्थळे सुरु आहेत, कुठेही मंदीर उघडली म्हणजे कोरोना पसरला असं एकही उदाहरण नाही. त्यामुळे दारू दुकाने सुरु करायला राज्य सरकारने परवानगी दिली तशीच धार्मिक स्थळे सुरु करायला द्यावी, कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.