chandrakant-dada-patil

  • या आंदोलनात भाजप डेअरींना दहा रूपये प्रतिलिटर प्रमाणे देण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनात रासप, रिपाइं आणि रयत क्रांती या संघटना सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर : दूध दरवाढीसाठी भाजप येत्या १ ऑगस्टला आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच या आंदोलनात भाजप डेअरींना दहा रूपये प्रतिलिटर प्रमाणे देण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनात रासप, रिपाइं आणि रयत क्रांती या संघटना सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर असताना तसेच महाराष्ट्रातील अनेक छोट्या जाती समूहांची मागासवर्गात त्यांना समाविष्ट करण्याची मागणी प्रलंबित असताना, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन केलेले नाही. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठन करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. 

महाविकास आघाडी सरकारमधील घटकांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच  हे आंदोलन हिंसक नसून, अधिकाऱ्यांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे, असे त्याचे स्वरूप असणार आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.