भाजप सर्व निवडणुका ताकदीने लढवणार

जिल्हा बँकेबरोबरच पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. त्याबरोबरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षांची ताकत आहे. तरी या संदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा करू.

    गारगोटी : प्रत्येक निवडणुकीत भाजपला गृहीत धरून सत्ता खेचली जाते. मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपची दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिल्हा बँकेसह सर्व निवडणुका ताकदीने भाजप लढवणार, अशा प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

    गारगोटी (ता. भुदरगड) येथे भाजपच्या संपर्क कार्यालयात झालेल्या भाजपच्या सेवा संस्था व इतर संस्था ठरावधारकांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मेळाव्यास भाजपचे नेते राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, संघटनमंत्री नाथाजी पाटील,  तालुका अध्यक्ष विनायक परूळेकर,प्रकाशराव कुलकर्णी, वसंतराव प्रभावळे,किरण कुरडे, योगेश परुळेकर, अनिल तळकर, प्रताप मेगाने, अमर पाटील, भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब भोई, सरपंच संदेश भोपळे यांची भाषणे झाली.

    यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक धोंडीराम मगदुम, प्रदीप पाटील, एम. डी. पाटील, शिवाजी मातले, गोपाल कांबळे, नारायण पाटील, पांडुरंग डेळेकर, सदाशिव देवरृडेकर, अलकेश कांदळकर, एम. एम. कांबळे, शहाजी ढेरे, दगडू राऊळ, सुरेश खोत, प्रताप पाटील, सुभाष पाटील सुरेश गुरव, शुभम मगदूम, संभाजी नलगे, सुनील खंटागळे, सचिन देसाई, विलास मालवेकर दिनकराव भोईटे दतात्रय पाटील अमोल कदम प्रमुख उपस्थित होते. स्वागत बजरंग कुरळे यांनी केले. तर आभार शहराध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी मानले.

    कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

    नेते राहुल देसाई म्हणाले, जिल्हा बँकेबरोबरच पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढणार असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. त्याबरोबरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षांची ताकत आहे. तरी या संदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा करू. भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील म्हणाले, भुदरगड तालुक्यात सेवा संस्था व इतर संस्था यांचे मतदार भाजपकडे असून भाजपला योग्य संधी द्यावी लागेल.