मुंख्यमंत्र्यावर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून लस घेऊन या; मंत्री सतेज पाटलांचा भाजपला सल्ला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद् फडणवीस यांना केंद्रात घेऊन जावे, आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस कसे देता येईल, याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा असं देखील यावेळी सतेज पाटील म्हणाले.

    कोल्हापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यांन गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष राज्य सरकारवर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेंड लॉकडाऊन चा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. याला मंत्री सतेज पाटील यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

    सतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस आणण्यासाठी सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.

    तसेच त्यांनी यावेळी विरोधकांचा  समाचार यावेळी घेतला. फुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले काम बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. एका बाजूला जनतेचा जिव कशाप्रकारे वाचेल, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र त्यावर भाजप टीका करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद् फडणवीस यांना केंद्रात घेऊन जावे, आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस कसे देता येईल, याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा असं देखील यावेळी सतेज पाटील म्हणाले.