जीआर बदला, अन्यथा जलसमाधी घेऊ; पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून शेट्टींचा सरकारला इशारा

महापुराला एक महिना होऊन केला तरी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली नाही. म्हणून आता आम्ही 8 दिवसांची मुदत देत आहोत. पंचनामे झाले आहेत, नुकसानाचा आकडाही आला आहे. आता जीआर बदला. 1 सप्टेंबरला आम्ही चिखली ते नृसिंहवाडीपर्यंत दिंडी काढणार आणि तिथे सामूहिक जलसमाधी घेणार, असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

    कोल्हापूर : राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी चांगले आक्रमक झाले आहे. सोमवारी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा जीआर बदला, अन्यथा नृसिंहवाडीत जलसमाधी घेऊ असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

    महापुराला एक महिना होऊन केला तरी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली नाही. म्हणून आता आम्ही 8 दिवसांची मुदत देत आहोत. पंचनामे झाले आहेत, नुकसानाचा आकडाही आला आहे. आता जीआर बदला. 1 सप्टेंबरला आम्ही चिखली ते नृसिंहवाडीपर्यंत दिंडी काढणार आणि तिथे सामूहिक जलसमाधी घेणार, असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

    जिल्ह्यातील मंत्र्यांनी कारण नसताना या मोर्चाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. आम्ही ईडीला घाबरत नाही. आता राजकीय निर्णय घेण्याची वेळ नाही. राजकारण हे आमचे साधन आहे, साध्य नाही, अशा शब्दात शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]